एरंडोल । ट्रॅक्टरवर कुठलीही कारवाई न करता सोडून देण्यासाठी ३० हजारांची लाच घेताना दोन तलाठ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. या कारवाईने लाचखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, कारवाईदरम्यान त्यांच्याकडे असलेली १.७३ लाखांची रोकडही जप्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार एरंडोल तालुक्यातील उत्राण अहिर व उत्राण गुजर सजा हद्दीतील नरेश भास्कर शिरूड (वय ४१, तलाठी उत्राण अहिर) व शिवाजी एकनाथ घोलप (वय ४६, तलाठी उत्राण गुजर) हे दोन तलाठी कार्यरत आहेत. गिरणा नदीपात्रातून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तलाठी शिरुड यांनी पकडले होते. त्यावर कुठलीही कारवाई न करता सोडून देण्यासाठी ३० हजार रुपये करण्यात आली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती.
यानंतर त्याची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा लावला. उत्राण येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वर असलेल्या एका खोलीत दोघा तलाठ्यांना ३० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. कारवाईदरम्यान तलाठी शिरुड याच्याकडे पथकाला १ लाख ७३ हजार ३०० रुपयांची रोकडे आढळली. या प्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















Discussion about this post