नाशिक । प्रजासत्ताक दिनाच्या नाशिक येथील शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने सुरु झालेला वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. वन विभागाच्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेतला असून या प्रकरणावर गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र महाजन यांनी केवळ दिलगिरी व्यक्त न करता, जाहीर लेखी माफी मागावी, अशी मागणी आता माधवी जाधव यांनी केली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीगिरी व्यक्त केलीय, पण त्यांनी जाहीर लेखी माफी मागावी अशी मागणी वन विभागाच्या महिला पोलीस कर्मचारी माधवी जाधव यांनी केली आहे. गिरीश महाजन यांचे सुदैव आणि माझे दुर्दैव हे प्रकरण ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत बसत नाही. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनी हे जाणून बुजून केले आहे.
कारण, आपल्या भाषणात त्यांनी इतर महापुरुषांची नावे घेतली, छत्रपती शिवाजी महाराज जे आमच्या ह्रदयात आहेत, छत्रपती संभाजी महाराज यांचेही त्यांनी नाव घेतले. मात्र, बाबासाहेबांचे नाव त्यांनी घेतले नाही, असा आरोप माधवी जाधव यांनी केला आहे. तसेच, गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त न करता लेखी माफी मागावी, त्यात आंबेडकर अनुयायी नागरिकांची माफी मागावी, असेही माधवी जाधव यांनी म्हटले. जोपर्यंत गिरीश महाजन माफी मागत नाहीत, तोपर्यंत मी माझ्या भूमिकेवर ठाम असणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.















Discussion about this post