जळगाव । राज्यातील वातावरणात सातत्याने मोठे बदल होताना दिसत आहेत. ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली. दरम्यान हवामान खात्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा अंदाज वर्तविला आहे. विशेष जळगावसाठी देखील मोठा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान विभागाने आज राज्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात आज ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.नंदूरबार, जळगाव, नाशिक, धुळे आणि अहिल्यानगर या भागात पावसाची हजेरी लागू शकते. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली. धुळ्यात 10.2 सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. निफाड येथे 10.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. ब्रह्यपुरी येथे 33.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सध्याच्या परिस्थितीली राज्यातून गारठा गायब झाला आहे.
राज्यातील किमान तापमानात वाढ कायम आहे. आज ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस काही भागात धुमाकूळ घालू शकतो. सतत हवामान बदलत असल्याने त्याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. शिवाय वाढलेल्या वायू प्रदूषणाने आरोग्याच्या असंख्य समस्या या निर्माण होत आहेत. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढताना दिसत आहे. पालिकेकडून दावा केला जात आहे की, आमच्याकडून प्रयत्न रोखण्याचे प्रयत्न सुरू असून कारवाई केली जात आहे.















Discussion about this post