मुंबई । आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून हालचालींना वेग आला आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान तर ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेतील एक महत्वाचा टप्पा असणार आहे. अशातच सिंधूदुर्ग जिल्ह्यात महायुतीच्या जागा वाटपाचा फॅार्म्युला जाहीर होताच एक मोठी घडामोड घडली आहे.
ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ओरोस मंडळातील इतर 42 प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही सामूहिक राजीनामे दिले आहेत. त्यामुळे ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीकडून व्यूहरचना आखली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर कणकवलीत एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठीकत खासदार आणि भाजप नेते नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तसेच महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठीकत जिल्ह्यातील सर्वच नेत्यांसोबत तसेच पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली.















Discussion about this post