धुळे । लाचखोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत असून त्यात शिक्षण क्षेत्रातही भ्रष्टाचाराची कीड खोलवर रुजल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. बिल आणि पगाराच्या फरकासाठी शांताबाई पिंगळे विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेस २,३४० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. भारती गिरीश जोशी (वय ५६) असं लाच घेणाऱ्या मुख्याध्यापिकाचे नाव असून विशेष लाखोंचा पगार असतानाही लाच घेतली. या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
या संदर्भात शाळेतील एका कर्मचाऱ्याने तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, कर्मचारी २४ वर्षांपासून शाळेत पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहे. कालबध्द पदोन्नती बिलाचा फरक तसेच पूर्णवेळ ग्रंथपाल पगाराच्या फरकसाठी त्यांनी मुख्याध्यापिका भारती जोशी यांची भेट घेतली होती. यावेळी अडीच हजार रुपयांची मागणी झाली. याबाबत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सापळा लावण्यात आला. यावेळी २,३४० रुपयांची लाच घेतांना भारती जोशी यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक यशवंत बोरसे, कर्मचारी राजन कदम, रेश्मा परदेशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.















Discussion about this post