जळगाव । जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या दोन तासांत मतदानाचा वेग मंद असल्याचे चित्र आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत अवघे ५.५ टक्के मतदान झाले आहे.
या कालावधीत एकूण 24,148 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये १४४९४ पुरुष तर ९६५४ महिलांचा समावेश आहे.सकाळच्या सत्रात अपेक्षित गर्दी न दिसल्याने मतदारांमधील उदासीनता की दुपारनंतर वाढणारी उपस्थिती? असा सवाल उपस्थित होत आहे. आता पुढील वेळेत मतदानाचा टक्का वाढतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post