नंदुरबार । नंदुरबारच्या शहाद्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात पतीच्या विवाहबाह्य संबंध आणि सततच्या शारीरिक-मानसिक छळाला कंटाळून एक विवाहित महिलेने आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. भाग्यश्री गौरव चौधरी ( वर्षे २९ ) असे या मृत महिलेचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील रमकुबाई नगरात सदर घटना घडली आहे. भाग्यश्री गौरव चौधरी ( वर्षे २९ ) असे या मृत महिलेचे नाव आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील रमकुबाई नगरात वास्तव्यास असलेल्या गौरव चौधरीने भाग्यश्रीला वेळोवेळी मारहाण केली. त्याच्या विवाहबाह्य प्रेयसीबरोबरचे संबंध असल्याने भाग्यश्रीने समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण त्यात यश मिळाले नाही. उलट, तिला अधिक जाच सहन करावा लागला. भाग्यश्रीच्या माहेरील आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने तिने हा अन्याय लपवला. मात्र, नेहमीच्या कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
भाग्यश्रीच्या आईने संगीता सुनील चौधरी यांनी शहादा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यात सांगितले की,भाग्यश्रीचा पती गौरवकुमार जगदीश चौधरी (वर्षे ३५) याचे बऱ्याच वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. याबाबत पत्नीचा तीव्र विरोध असल्याने गौरवकडून तिचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ होत होता.
मृत भाग्यश्री चौधरीच्या आईच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसांनी गौरव चौधरी आणि त्याच्या प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असून शहादा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के.जे. पटेल यांच्या कोर्टात दोघांना हजर केले गेले. यात गौरव चौधरीला १९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी, तर प्रेयसीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.















Discussion about this post