नवी दिल्ली । २०२६ या वर्षी देशातील ६ राज्यांमधील विधानसभा निवडणुका होणार असून त्यापूर्वी भाजपने कंबर कसायाला सुरुवात केलीय. दरम्यान भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. भाजप अध्यक्षपदाची निवडणूक १९-२० जानेवारी रोजी होणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे.
१९ जानेवारी रोजी नामांकन दाखल केले जाणार आहेत. तर अध्यक्षपदासाठी २० जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह दहा पक्ष आणि संघटनात्मक नेते प्रस्तावक असणार आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा हे सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे. मात्र, त्यांची मुदत लोकसभा निवडणुकीआधीच संपली आहे. त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पक्षाने नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी १९-२० जानेवारी या तारखा निश्चित केल्याचे समजते. १९ जानेवारीला उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि २० जानेवारीला मतदान होईल.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नितीन नबीन अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. जर त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली तर ते या पदावर असलेले सर्वात तरुण असतील. त्यांचा कार्यकाळ जानेवारी २०२९ पर्यंत राहील. २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे त्यांचा कार्यकाळ वाढवता येऊ शकतो.
नितीन सलग पाच वेळा आमदार
१५ डिसेंबर २०२५ रोजी नितीन नबीन यांची भाजपचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तथापि, खरमास उत्सवामुळे त्यांचा कार्यकाळ लांबला. ४५ वर्षीय नितीन नबीन हे बिहार सरकारमध्ये रस्ते बांधकाम मंत्री आहेत. त्यांचे वडील नवीन किशोर सिन्हा हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. नितीन यांनी २००६, २०१०, २०१५, २०२० आणि २०२५ मध्ये सलग बंकीपूर मतदारसंघातून विजय मिळवला.















Discussion about this post