मुंबई । स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत तुमचं खातं असेल आणि तुम्ही एटीएममधून नियमित कॅश काढत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. एसबीआयने एटीएम ट्रान्जॅक्शन चार्जमध्ये वाढ केली आहे. इंटरचेंज फी वाढल्याचे कारण देत बँकेने एटीएम आणि ‘एडी डब्लूएम’ मशिनद्वारे होणाऱ्या व्यवहारांचे दर बदलले आहेत. हे नवीन नियम १ डिसेंबर २०२५ पासूनच लागू करण्यात आले आहेत.
SBI ग्राहकांसाठी दरमहा काही विनामूल्य ATM व्यवहार निश्चित केले आहेत, ज्यामध्ये आपण शुल्क न भरता पैसे काढू शकता किंवा इतर सेवांचा लाभ घेऊ शकता. यानंतर, जेव्हा आपण ही विनामूल्य मर्यादा ओलांडाल, तेव्हा आपल्याला पैसे काढण्यावर 23 + GST भरावा लागेल. या नवीन दराच्या आधी शुल्क 21 + GST होते, जे आता वाढविण्यात आले आहे. तसेच नॉन-फायनान्शिअल ट्रान्झॅक्शन (बॅलन्स चेक इ.) १० रुपयांऐवजी आता ११ रुपये + GST लागतील. बँकेने काही सेवांवरील शुल्कात कोणताही बदल केलेला नाही, ज्यामुळे सामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
बदल का करण्यात आले?
रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बँकांना एकमेकांच्या एटीएम नेटवर्कचा वापर करण्यासाठी ‘इंटरचेंज फी’ द्यावी लागते. ही फी वाढल्यामुळे बँकांनी हा बोजा ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयपाठोपाठ इतर खासगी बँकाही लवकरच अशाच प्रकारची शुल्कवाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Discussion about this post