मुंबई । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निकालानंतर आता राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून यानंतर राज्यातील १२ झेडपीच्या निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला जात होता. पण आता या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
कारण, त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे. सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल झाली आहे.
या याचिकेवर उद्या सोमवारी सुनावणी पार पडणार आहे. 50 टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येत असल्याचे समोर आले होते. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील ३२ जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्यात याव्यात, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.















Discussion about this post