जळगाव । जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीना वेग आला असून अशातच एक मोठी बातमी समोर आलीय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा त्याग करत शिवसेना ठाकरे गटातून उमेदवारी केलेले प्रभाकर सोनवणे यांनी भाजपात दाखल झाले आहे. तर दुसरीके राष्ट्रवादीत वरिष्ठांशी बिनसल्याने नाराज असलेले अभिषेक पाटील यांनी मंत्री गिरीश महाजनांसोबत दोन तास चर्चा केली. त्यामुळे ते देखील लवकरच ‘कमळ’ हाती घेण्याची शक्यता आहे.
मनपा निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीची रणनीती आखायला भाजप नेत्यांकडून सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रभाकर सोनवणे यांनी विधानसभा निवडणूक तोंडावर भाजपला जय श्रीराम केला होता. त्यानंतर चोपडा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता; परंतु त्यात त्यांचा पराभव झाल्यानंतर ते पुन्हा भाजपच्या वाटेवर होते.
महायुतीच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे सोनवणे यांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लागत होता; परंतु दोन दिवसापूर्वीच मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, संजय गरुड, अशोक कांडेलकर या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांना भाजपत दाखल करून घेण्यात आले. परंतु त्यांच्या भाजप प्रवेशामुळे एकनिष्ठ व अनेक दिवसांपासून निवडणुकीची तयारी करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. मनपा निवडणुकीप्रमाणेच जि.प. निवडणुकीतही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
अभिषेक पाटील यांची दोन तास चर्चा
मनपात कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही असलेले महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांचे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बिनसले. त्यामुळे त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. पाच दिवसांनी त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांची सोमवारी रात्री भेट घेतली. जीएम फाउंडेशन येथे झालेल्या बैठकीला आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते. दरम्यान न मनपा मनपा निवडणुकीनंतर नि अभिषेक पाटलांचाही भाजपत प्रवेश होऊ शकतो.















Discussion about this post