जळगाव । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका अवैध कुंटणखान्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत देहविक्री व्यवसाय चालवणाऱ्या एक महिला आणि दोन पुरुषांना अटक केली आहे. तर या कारवाईदरम्यान 5 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
याबाबत असे की, जळगाव एमआयडीसी परिसरात असलेल्या नीलंबरी हॉटेलच्या मागे आणि हॉटेल सुनील सिंगच्या समोर एका ठिकाणी अवैध देहविक्रीचा व्यवसाय (कुंटणखाना) सुरू असल्याची माहिती जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
यावेळी या बेकायदेशीर व्यवसायात सहभागी असलेली १ महिला आरोपी आणि २ पुरुष आरोपी यांना पोलिसांनी पकडले आहे. तसेच घटनास्थळी ५ पीडित व्यक्ती आढळून आल्या असून त्याची सुटका करण्यात आलीय. ही कामगिरी जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.















Discussion about this post