Tuesday, April 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शिधापत्रिकाधारकांसाठी महत्वाची बातमी ! रेशन धान्य वितरणाच्या नियमांत 1 जानेवारीपासून बदल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 17, 2025
in महाराष्ट्र
0
देशातील ८१ कोटी रेशनकार्डधारकांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
बातमी शेअर करा..!

मुंबई । शिधापत्रिकेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. रेशन धान्य वितरणाच्या नियमांत 1 जानेवारी 2026 पासून बदल करण्यात आला आहे. यामुळे लाखो शिधापत्रिकाधारकांच्या मासिक धान्य मिळकतीत बदल होणार असून, पुरवठा विभागाने याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

राज्यातील अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी (PHH) योजनेंतर्गत धान्य वितरणाचे प्रमाण जानेवारी 2026 पासून नव्याने निश्चित करण्यात आले आहे. नव्या निर्णयानुसार, जानेवारी 2026 पासून अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रती शिधापत्रिका 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू देण्यात येणार आहे. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत प्रत्येक सदस्यासाठी दरमहा 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू वाटप करण्यात येईल. हा बदल राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील मूळ तरतुदींनुसार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

खरंतर, या योजनांतील धान्य वितरणाच्या प्रमाणात गेल्या काही काळात बदल करण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात अंत्योदय कार्डधारकांना 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू, तर प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू दिले जात होते. मात्र नंतर पुरवठा विभागाने तात्पुरता बदल करत अंत्योदय लाभार्थ्यांसाठी 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू, तर प्राधान्य कुटुंबासाठी प्रति सदस्य 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू असे वितरण सुरू केले होते.

या बदलामुळे तांदळाचे प्रमाण वाढले असले तरी गव्हाचे प्रमाण कमी झाले होते. अनेक भागांत लाभार्थ्यांनी या बदलाबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. काही ठिकाणी तांदळाची मागणी अधिक असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले, तर गहू कमी झाल्यामुळे काही कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे आता पुन्हा मूळ प्रमाण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की डिसेंबर 2025 महिन्यासाठी सध्या सुरू असलेलेच वितरण प्रमाण कायम राहणार आहे. म्हणजेच डिसेंबरमध्ये अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू, तर प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति सदस्य 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू असेच धान्य मिळणार आहे. या महिन्यात कोणताही बदल लागू होणार नाही.

जानेवारी 2026 पासून मात्र नव्याने निश्चित केलेले प्रमाण लागू होईल. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी या बदलाची माहिती लक्षात घेणे आवश्यक आहे. रास्त दर दुकानांवर होणाऱ्या वाटपात त्यानुसार नियोजन केले जाणार असल्याने, लाभार्थ्यांनी आपल्या शिधापत्रिकेवरील सदस्यसंख्या आणि धान्याचे प्रमाण तपासून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

राज्यातील गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे धान्य वितरणात होणारे बदल थेट त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे ठरतात. जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या नव्या प्रमाणामुळे तांदूळ आणि गहू यामधील संतुलन पुन्हा साधले जाणार असून, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील मूळ उद्दिष्टांनुसार धान्य वाटप केले जाणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा कधी उडणार ; मोठी अपडेट समोर

Next Post

भाजपने काँग्रेसचा आमदार फोडला; महिला आमदार कमळ हातात घेणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भाजपने काँग्रेसचा आमदार फोडला; महिला आमदार कमळ हातात घेणार?

भाजपने काँग्रेसचा आमदार फोडला; महिला आमदार कमळ हातात घेणार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढीवरे रुजू; डॉ. महेश्वर रेड्डींकडून स्वीकारली सूत्रे

जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढीवरे रुजू; डॉ. महेश्वर रेड्डींकडून स्वीकारली सूत्रे

April 21, 2026
मोठी बातमी ! इस्त्रायलच्या पंतप्रधानांना होऊ शकते कोणत्याही क्षणी अटक?

मोठी बातमी ! इस्त्रायलच्या पंतप्रधानांना होऊ शकते कोणत्याही क्षणी अटक?

April 21, 2026
एलआयसी मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी ; पात्रता घ्या जाणून

पदवी पास आहात का? एलआयसीमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी

April 21, 2026
चोपड्यात तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, एका संशयिताला अटक

चोपड्यात तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, एका संशयिताला अटक

April 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page