नाशिक । महायुती सरकारचे क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद धोक्यात आहेत. कारण शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटे यांना प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली दोन वर्षे कारावासाची शिक्षा कायम ठेवली असून यामुळे कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता आहे. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी एम बदर यांनी कोकाटे यांना शिक्षा सुनावली आहे.
वीस वर्षांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री स्वेच्छा निधीतील दहा टक्के योजनेतील सदनिका घेतली होती. स्वतः तसेच बंधू विजय कोकाटे यांच्या नावे त्यांनी दोन सदनिका घेतल्या होत्या. बनावट कागदपत्रे सादर करून या सदनिका त्यांनी लाटल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
याप्रकरणी कोकाटे यांना २ वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. या शिक्षेविरोधात माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर आता न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे. कोर्टाच्या निकालानंतर आता कोकाटेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार असून त्यांचं मंत्रीपदही जाण्याची शक्यता आहे.















Discussion about this post