मुंबई । गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा असलेल्या मनसे-शिवसेना युतीबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. राज्यातील महापालिका निवडणुका जाहीर होताच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. या भेटीमागचे अधिकृत कारण मतदार यादीतील घोळाविरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काढलेल्या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात असल्याचे बोललं जात आहे. मात्र या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच या भेटीमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संभाव्य युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
आता या भेटीनंतर, ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यासाठीची तारीखही लवकरच जाहीर होईल, असे बोलले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि मनसे ही संभाव्य युती झाल्यास मुंबईसह राज्यातील अनेक समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.















Discussion about this post