नवी दिल्ली । नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. नगरपालिका आणि नगर पंचायतीची मतमोजणी २१ डिसेंबरलाच होणार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली यावेळी सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे.
या सुनावणीत कोर्टाने कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ आधी पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच हायकोर्टातील याचिकांमुळे निवडणूक कार्यक्रमांवर कोणताही परिणाम होता कामा नये, असे देखील कोर्टाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी झालेल्या सुनावणीत राज्य निवडणूक आयोगाने अखेरच्या क्षणी निवडणुकांचा निकाल पुढे ढकल्याने खंडपीठाने आयोगाने चांगलचं झापले. न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठापुढे याविषयीची सुनावणी झाली. निवडणूक आयोगाने कॅलेंडर पाळायला हवं होतं, अशा शब्दांत उच्च न्यायालयाचे आयोगाला सुनावले.















Discussion about this post