जळगाव । गेल्या आठवड्यात थंडी गायब झाली होती. पण, शनिवारी (ता. २९) किमान तापमानात अचानक घट झाल्याने थंडी वाढली. अवघ्या एका दिवसात तब्बल ६ अंशांनी किमान तापमान घटल्याने जळगाव जिल्ह्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे.
जळगाव शहरात शुक्रवारी किमान तापमान १७ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३१ अंश नोंदवले गेले होते. शनिवारी दोन्ही तापमानात घट झाली. कमाल तापमान २८ अंशांवर आले तर किमान तापमान घसरून ११ अंशांवर घसरले.त्यामुळे सकाळच्या सत्रात गारठा पुन्हा जाणवू लागला.
का घसरला पारा?
‘डिटवाह’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ हवामान होत असतानाच, अचानकपणे गारठा वाढला आहे. उत्तरेकडील थंड वारे आल्याने किमान तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. शनिवारी पहाटे धुके पसरल्याचे दिसून आले. गारठा वाढल्याने हुडहुडी वाढली होती. किमान तापमानात अचानक घट झाल्याने थंडी वाढली आहे.















Discussion about this post