जळगाव । एकीकडे लग्नसराई सुरु असताना सोन्यासह चांदी दरात तेजी दिसून येत आहे. जळगाव सराफ बाजारात शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १०३०, तर चांदीत प्रति किलो ७००० रूपयांपेक्षा अधिक वाढ नोंदवली गेली होती. यांनतर आज शनिवारी सोन्यात पुन्हा मोठी वाढ दिसून आली. दुसरीकडे मात्र चांदीत घट दिसून आली.
जळगाव सराफ बाजारात आज शनिवारी सोने दरात १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोने एक लाख ३२ हजार रूपयांपर्यंत पोहोचले. शहरात दिवाळीच्या आधी १७ ऑक्टोबरला २४ कॅरेट सोन्याने जीएसटीसह एक लाख ३५ हजार रूपयांचा उच्चांक केला होता. आताही सोन्यात कमी-अधिक फरकाने सातत्याने दरवाढ सुरूच आहे. त्यामुळे सोने मागील उच्चांक मोडीत काढून लवकरच नवीन उच्चांक प्रस्थापित करण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे आज चांदी दरात १०३० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदी एक लाख ७७ हजार १६० रूपयांवर स्थिरावली. आठवड्याच्या सुरूवातीला २४ नोव्हेंबर रोजी चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५९ हजार ६५० रूपयांपर्यंत घसरली होती.















Discussion about this post