मुंबई । शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ‘लक्ष्मी’ संबंधीच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. गुलाबराव पाटील यांनी प्रचार सभेत बोलताना म्हटले होते की, “एक तारखेला घराबाहेर खाटा टाकून झोपा लक्ष्मी येणार आहे. खा त्यांचं मटण पण बटन दाबा आमचं असं गुलाबराव पाटील म्हणाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्याचा संदर्भ घेत जोरदार पलटवार केला आहे. लक्ष्मी दर्शन होत असेल तर दर्शन करून घ्या. कारण देणाऱ्यांकडे आलेली संपत्ती ही त्यांची कष्टाने मिळवलेली नाही. ती संपत्ती तुम्हीच घ्या आणि मतदान मात्र आपल्या उमेदवारांनाच करा, अशी बोचरी टीका भगरे यांनी केली.
भाजप-शिंदे गटाकडून निवडणुकांमध्ये लक्ष्मीवाटप होत असल्याचे पाटील यांचे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले होते. आता भगरे यांनी प्रतिउत्तर दिले आहेत















Discussion about this post