इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती जाहीर करण्यात आली असून या नोकरीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सरकारी बँकेतील नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या भरतीद्वारे एकूण ३०० पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहे या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ११ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आली आहे.या नोकरीसाठी इच्छुकांनी १ डिसेंबरपूर्वी अर्ज करावेत. या नोकरीसाठी इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
पात्रता
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत असिस्टंट मॅनेजर आणि ज्युनिअर असोसिएट पदासाठी भरती जाहीर केली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेतील या नोकरीसाठी ippbonline.bank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. ३०९ पदांसाठी भरती केली जाणार आहे. २० ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेतील या https://saamtv.esakal.com/topic/jobसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल असावे. याचसोबत ग्रुप सी किंवा ग्रुप बी पदावर काम करण्याचा ३ वर्षांचा अनुभव असावा. असिस्टंट मॅनेदर पदासाठी ग्रॅज्युएशन केलेल्या उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. उमेदवाराला ५ वर्षांचा कामाची अनुभव असावा.
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ippbonline.bank.in वेबसाइटवर जावे.
यानंतर Current Openingsवर जाऊन संबंधित भरती लिंकवर क्लिक करा.
यानंतर Apply Now वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला Click here for New Registration वर क्लिक करायचे आहे. यानंतर माहिती भरावी.
यानंतर लॉग इन करुन स्वतः ची माहिती भरावी.
फोटो, सही आणि माहिती भरुन फॉर्म अपलोड करावा. त्यापूर्वी तुम्ही प्रिंट आउट काढून ठेवावी.















Discussion about this post