बिहार विधानसभा निवडणूक २०२५ चा अंतिम निकाल आज शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. बिहार विधानसभेच्या सर्व २४३ जागांसाठी मतमोजणीची सुरुवात सकाळी ८.०० वाजता झाली आहे. दरम्यान,सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएला आघाडी मिळताना दिसून येत आहे.
सुरूवातीच्या कलानुसार एनडीए आघाडीवर असून एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. एनडीएला १३२ जागांवर, महाआघाडी ७२ जागांवर आणि इतर ५ जागांवर आघाडीवर आहेत. आतापर्यंच्या कलानुसार भाजप बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुती आणि महाआघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. सर्व मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी झाली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजप राजनगर, औरई, बरुराज, साहेबगंज आणि कुम्हारार या जागांवर आघाडीवर आहे. विरोधी पक्ष आरजेडीने बनियापूर आणि दानापूरमध्ये आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस बिक्रममध्ये आघाडीवर आहे.
बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार हे आज निश्चित होणार आहे. एनडीए आणि महाआघाडीमध्ये जोरदार टक्कर सुरू आहेत. तर नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात चुरशीची लढत होताना पाहायला मिळत आहे. यापैकी कोण विजयी होईल हे येत्या काही तासांच स्पष्ट होईल. २४३ मतदारसंघांमध्ये बहुमतासाठी १२२ जागांवर विजयी होणं गरजेचे आहे.
बिहारमध्ये २४३ मजागांसाठी दोन टप्प्यामध्ये मतदान झाले होते. आज मतमोजणी सुरू असून ४६ मतदान केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. नितीश कुमार यांनी विजय आपलाच होईल अशी घोषणा केली. तर तेजस्वी यादव यांनीही १८ नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ आपणच घेणार असा दावा त्यांनी केला. बिहारमध्ये नितीश कुमार सत्ता टिकवून ठेवतील की तेजस्वी यादव बिहारची सत्ता मिळवण्यात यशस्वी होतील याचे चित्र आज स्पष्ट होईल.















Discussion about this post