मुंबई । भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ झाली असून शिरूर कासार न्यायालयाने चित्रा वाघ यांच्या विरोधात वॉरंट जारी केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या प्रकरणात न्यायालयाने हे वॉरंट जारी केले असल्याची माहिती मेहबूब शेख यांचे वकील अंकुश कांबळे यांनी दिली आहे.
चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मेहबूब शेख यांनी न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयाकडून वारंवार समन्स पाठवून देखील चित्रा वाघ हजर झाल्या नाहीत. त्यामुळे आता न्यायालयाने आज त्यांच्या विरोधात वॉरंट काढला असल्याची माहिती अंकुश कांबळे यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्यावर तरुणीचा छळ केल्याचा आरोप केला होता. चित्रा वाघ यांनी केलेल्या या कथित बदनामीकारक वक्तव्यामुळे पुढे हा वाद वाढला. त्यानंतर मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे आपली प्रतिमा आणि अब्रू धुळीस मिळाल्याचा आरोप करत शिरूर कासार न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने चित्रा वाघ यांना वारंवार समन्स बाजावून देखील त्या न्यायालयात हजर झाल्या नव्हत्या. आज अखेर न्यायालयाने चित्रा वाघ यांच्या विरोधात वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने अनेक वेळा समन्स पाठवले, मात्र चित्रा वाघ यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे न्यायालयाने पुढील प्रक्रिया म्हणून वॉरंट जारी केले असल्याची माहिती शेख यांचे वकील अंकुश कांबळे यांनी दिली आहे.















Discussion about this post