मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींत घेतल्याप्रकरणी अडचणीत सापडलेत असून विरोधकांनी या प्रकरणी अजित पवारांवर टीकेची झोड उठवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत एक चौकशी समिती स्थापन केली आहे. आता याप्रकरणावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन व्यवहार प्रकरणी शरद पवार यांनी चौकशी व्हावी, अशी मागणी केली. पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नोंदवला नाही असंही शरद पवारांना विचारण्यात आलं यावर शरद पवार म्हणाले की, पार्थवर गुन्हा का नोंद नाही? याबाबत गृहमंत्री फडणवीस योग्य माहिती सांगू शकतील अर्थातच ते बोलू शकतील. त्यांनी चौकशी करून वास्तव समोर आणावं, असं ते म्हणाले.
तसेच मुंढव्यातील हा जमीन व्यवहार दुय्यम निबंधकांनी रद्द केला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्याकडे मजबूत पुरावे गोष्टी असतील, त्याआधारे निर्णय घेतला असेल,असेही शरद पवार यांनी म्हटले.















Discussion about this post