जळगाव । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ चे आयोजन रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात येणार आहे.
या परीक्षेच्या आयोजनाची कार्यवाही सुरू असून, परीक्षेसंबंधित सर्व अधिकृत माहिती वेळोवेळी परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी सांगितले आहे.
तसेच, परीक्षेबाबत युट्युब चॅनेल्स, सोशल मीडियावरील विविध पोस्ट्स किंवा प्रसारमाध्यमांद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, अशी माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळे www.mscepune.in आणि http://mahatet.in यांच्यावर प्रकाशित सूचनांचा आधार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार असतील, अशी स्पष्ट सूचना परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.















Discussion about this post