मुंबई । मराठा आंदोलनक नेते मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला. माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी सुपारी दिल्याचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान मनोज जरांगे यांच्या या आरोपानंतर खुद्द धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
त्यांनी जरांगेंच्या सर्व आरोपांची स्पष्टपणे उत्तर देत माझ आणि जरांगे यांचं काही वैर नसल्याचं म्हटलं. मी मुंबईतील मराठा आंदोलनात सामील झालो होतो. माझं जरांगेंशी काही वाकडं नाही, माझ्याकडून त्यांना कसला धोका आहे ? असा सवाल त्यांन विचारला. जरांगे यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावं. तुमची तयारी कधी? EWS मध्ये जास्त आरक्षण. तुम्ही हाके यांना मारलं, तुम्ही वाघमारेंना मारलं ही प्रवृत्ती कुणाची. माझा त्यांचा बांधला बांध नाही. मी कट कशाला करू असं विचारत संतापलेल्या मुंडे यांनी जरांगे यांना सडेतोड उत्तर दिली. एवढंच नव्हे तर जरांगे यांना या सर्व गोष्टी महागात पडतील, असा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला.
जरांगे आणि माझी नार्को टेस्ट करा –
धनंजय मुंडे विश्रामगृहातील बैठकीबद्दल सांगितले की,’निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नाव घेतले. मी शासकीय विश्रामगृहात दर सोमवारी बसतो. अनेक जण भेटतात. आता अटक झालेले त्यापैकी काही भेटले असतील. यांच्यात असला कट, त्यांनीच पाठवले का? ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत. माझी प्रतिमा कशी तयार केली जात आहे. कारण मी सभेत दोन प्रश्न उपस्थित केले म्हणून. माझं म्हणणं आहे या प्रकरणात CBI ने चौकशी केली पाहिजे. माझी ब्रेन मॅपिंग करा, नार्को टेस्ट करा. आरोपींची, जरंगेंची आणि माझीसुद्धा ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा.’















Discussion about this post