मुंबई । मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जालना पोलिसांनी गुरुवारी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील या बड्या नेत्याने हा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे.
धनंजय मुंडे माझ्याविरोधात कट रचत असल्याचा आरोप केला असून धनंजय मुंडे यांचा जवळचा व्यक्ती असलेला कांचन याचेही नाव मनोज जरांगे पाटील यांनी घेतले आहे. धनंजय मुंडे आणि कांचन यांच्यामध्ये २० मिनिटांची चर्चा झाली. त्यांनी दोन व्यक्तीला सोबत घेऊन घात करण्याचा प्रयत्न केला. आधी मला बदनाम करण्याचा डाव आखला. पण त्यात यश मिळाले नाही. त्यानंतर जिवे मारण्याचं ठरवलं. पण तेही त्यांना जमलं नाही. त्यानंतर त्यांनी औषध, विष द्यायचा प्रयत्न केला. पण यश आले नाही. आम्ही सावध असल्याने हे शक्य झाले नाही.
हा खळबळजनक खुलासा करण्याआधी जरांगे यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. मराठा समाजाने शांत राहावे. कारण, मी जोपर्यंत जिवंत आहे. तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही. मी मेल्यावर तुम्हाला काय करायचे ते करा. पण मी आहे तोपर्यंत शांत राहा. त्यांनी काही कऱण्याआधीच त्यांचे डाव उघडे पाडलेत. समाजासाठी लढायला तयार आहे. सतर्क, सावध नसतो तर आपल्याला सर्व मिळाले नसते. आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती. हे कुणीही असो सर्व नायनाट होणार, तुम्ही फक्त शांत राहा. तुम्ही हसला पाहिजे असे काम करून दाखवतो. आता सुखाचे दिवस आले आहेत, असे सर्वजण म्हणतील, असे मनोज जरांगे म्हणाले.















Discussion about this post