जळगाव – मराठी रंगभूमी दिनानिमित्त आज समर्थ कला बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अनेक वर्षांपासून ही संस्था राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका, पथनाट्य, एकपात्री नाट्य, बालनाट्य आणि महानाट्य अशा विविध माध्यमांतून जळगाव रंगभूमीशी घट्टपणे जोडलेली आहे.
संस्थेतर्फे दरवर्षी बालनाट्य प्रशिक्षण शिबिर, विविध नाट्यस्पर्धा तसेच अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन करून नवोदित बालकलाकारांना व युवकांना नाटकाची आवड जोपासण्यासाठी आणि अभिनय कौशल्य विकसित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.
मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या कलाकारांनी यापूर्वी सादर केलेल्या ‘लाल चिखल’ या एकांकिकेतील काही प्रवेश पुन्हा सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. या प्रसंगी कलाकारांनी “प्रत्यक्ष नाटक कसे जगावे” आणि रंगमंचावरून नवनवीन प्रयोग कसे साकारावेत, याचे उत्कृष्ट दर्शन घडवले.
या सादरीकरणात विशाल जाधव रूपांतरित ‘लाल चिखल’ या एकांकिकेतील प्रवेश सादर करताना कोमल नेमाडे, योगेश लांबोळे, राहुल निकम, सागर सदावर्ते, भीमराव सपकाळे, महेश कोळी, रोहिणी निकुंभ, पूर्वा जाधव आणि समर्थ जाधव या कलाकारांनी प्रभावी भूमिका साकारल्या.















Discussion about this post