नांदर । राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापत असताना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. राजकीय प्रचाराला आलेलो नाही. नेते येतात आणि तुमच्या कोपराला गूळ लावून जातात. शेतकऱ्यांनी आयुष्यात पाहिला नाही एवढा पाऊस झाला. हेक्टरी 50 हजारांची मागणी शेतकऱ्यांची आहे. दयावान सरकारचा अभ्यास सुरू आहे. अभ्यास कसला करताय. परदेशी समिती येणार म्हणे. मुख्यमंत्र्यानी कोपराला गूळ लावत 30 जून 2026 ची तारीख सांगितली आहे,” असा निशाणा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
आजपासून उद्धव ठाकरे हे मराठ्याच्या दौऱ्यावर असून चार दिवसांच्या दौऱ्यात ते येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्याशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. आज त्यांनी मराठवाड्यातील नांदर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
सरकारने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन जाहीर केले होते. पण अजूनही अनेकांना मदत मिळालेली नाही. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. पॅकेज ही थट्टा आहे. अकोल्यात दोन रूपये पिकविमा मिळाला आहे. ही थट्टा चाललीय, असे म्हणत त्यांनी सरकारला धारेवर धरले. न्याय मिळेपर्यंत तुमच्यासोबत राहणार असा शब्द उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करावी या मागणीसाठी आग्रही आहेत. नुकतेच प्रहारचे बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी महाएल्गार पुकारला होता. जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी केला होता. या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली. सरकारसोबत बच्चू कडू आणि शेतकरी यांची बैठक पार पडली.
जूनची मुदत आम्हाला मान्य नाही: उद्धव ठाकरे
या बैठकीनंतर बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतले. माध्यमांशी बोलताना ३० जून २०२६ कर्जमाफीची तारीख मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. यावर उद्धव ठाकरे यांनी “जिल्हा परिषद निवडणुकीत पंतप्रधान येतील आणि कोपराला गूळ लावून जातील. जूनची मुदत आम्हाला मान्य नाही, तात्काळ कर्जमाफी हवी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.















Discussion about this post