जळगाव । राज्यात अस्मानी संकट कायम असून हवामान खात्यानं नोव्हेंबर महिन्यात धो धो पावसाचा इशारा दिला आहे. नवीन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांसाठी भारतीय हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ आणि ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे.
हवामान खात्याचा अंदाज आहे की पुढील 24 तास मुंबई आणि त्याच्या उपनगरात हलक्या ते मध्यम पावसासह ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान २९°C आणि २५°C च्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे.
अनेक जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी
पुढील एक ते दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू राहील आणि भारतीय हवामान खात्याने अनेक भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्यानुसार, कोकण, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिक, नंदुरबार, जळगाव आणि धुळे येथे जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल आणि हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहिल्यानगरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या मते, आज चार कोकण जिल्ह्यांसाठी (रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर) पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आज मध्य महाराष्ट्रासाठी वादळाचा इशारा देण्यात आला आहे आणि नाशिक, नंदुरबार, जळगाव आणि धुळे या चार जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.















Discussion about this post