सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांच्या कामाची बातमी आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. तुम्हाला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०२५ आहे. इच्छुकांनी त्याआधी अर्ज करायचे आहेत.
दिल्ली मेट्रोतील या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. तुम्हाला delhimetrorail.com या वेबसाइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करायचा आहे. हा अर्ज भरुन तुम्हाला जनरल मॅनेजर (एचआर), प्रोजेक्ट दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, बारखंभा रोड, नवी दिल्ली येथे पाठवायचा आहे. तुम्हाला या नोकरीसाठी तुम्ही कागदपत्रांची स्कॅन कॉपी career@dmrc.org या ई मेलवर पाठवायची आहे.
दिल्ली मेट्रोत जनरल मॅनेजर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिविल इंजिनियरिंगमध्ये बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. तसेच उमेदवाराकडे रेल्वे, केंद्र सरकार, राज्य सरकारच्या विभागात काम करण्याचा अनुभव असायला हवा. याचसोबक कॉम्प्युटर नॉलेजदेखील असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय ५५ ते ५७ पेक्षा जास्त नसावे.
परीक्षेशिवाय होणार निवड
या नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. यानंतर इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाणार आहे. इंटरव्ह्यूमध्ये क्लिअर झाल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला १,२०,००० ते २,८०,००० रुपये पगार मिळणार आहे.















Discussion about this post