जळगाव । गुरे चोरांना पकडून अमळनेरला घेऊन जात असताना पोलिसांच्या ताब्यातून दोन संशयित आरोपी बेड्यांसह पळून गेले. या प्रकरणी कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या चार पोलिस डॉ. महेश्वर रेड्डी यांनी निलंबनाची कर्मचाऱ्यांवर पोलिस अधीक्षक कारवाई केली.
बुधवारी रात्री साडेअकराला गुरे चोरणाऱ्या ४ संशयितांना पोलिस शासकीय वाहनाने अमळनेरला घेऊन जात होते. वाहन हळू होताच कुहे अंडरपास येथून शाकीर शाह अरमान शाह (वय ३०, रा. सुप्रीम कॉलनी) व अमजद शेख फकीर कुरेशी (वय ३५, रा. अशोक किराणाजवळ, मेहरुण) हे दोघे वाहनातून उडी मारुन पळून गेले होते. या दोघांविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना जळगाव शहरातून पकडण्यात आले होते. दोघे बेड्यांसह अंधाराचा फायदा घेत पसार झाले. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला.
या चौघांवर कारवाई
पोलिसांच्या तावडीतून संशयित बेड्यांसह पळून गेल्या प्रकरणी डॉ. रेड्डी यांनी हेड कॉन्स्टेंबल संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, हरीलाल पाटील व राहुल कोळी यांना निलंबित केले.















Discussion about this post