Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई ; दोन गावठी पिस्तूलसह दोन आरोपींना अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 24, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई ; दोन गावठी पिस्तूलसह दोन आरोपींना अटक
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विविध मिशन राबविले जात असून याच दरम्यान रेकॉर्डवरील आरोपींवर लक्ष ठेवण्याच्या आदेश देण्यात आले आहे. अशातच भुसावळ पोलिसांनी मोठी कारवाई केली. कारवाईत दोन गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कुणाल नितीन ठाकूर (वय 19, रा. कस्तुरी नगर, भुसावळ) व उदय राजू उजलेकर (वय 24, रा. वरणगाव) असं अटक केलेल्या दोघांचे नाव आहे.

याबाबत असे की, पोलिस कर्मचारी विजय नेरकर आणि जावेद शहा हे रात्रीच्या गस्तीदरम्यान असताना त्यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी कुणाल नितीन ठाकूर (वय 19, रा. कस्तुरी नगर, भुसावळ) हा रेगोली हॉटेलजवळील त्रीमूर्ती प्रोव्हिजन समोर गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह थांबला आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे डी.बी. पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विजय नेरकर, राजेश काळे, जावेद शहा, पंकज तायडे, सुनिल सोनवणे आणि चालक हसमत अली सय्यद यांनी छापा टाकला. त्यावेळी कुणाल ठाकुर यास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी गावठी पिस्तूल मॅगझीनसह आणि दोन जिवंत काडतुसे आढळली.

कुणाल ठाकुरवर गुन्हा क्रमांक 488/2025 असा दाखल करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध आर्म्स ॲक्ट कलम 3/25, 5/25 सह म.पो.का. कलम 37(1)(135) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान कुणाल ठाकुर याने ही पिस्तूल उदय राजू उजलेकर (वय 24, रा. वरणगाव) याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार उजलेकर यास अटक करून त्याच्याकडून वरणगाव येथून आणखी एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत.

दोन्ही आरोपींकडून एकूण 58 हजार रुपये किमतीच्या दोन लोखंडी गावठी पिस्तुली आणि 3 हजार रुपये किमतीच्या तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस कर्मचारी विजय बळिराम नेरकर करत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शेतकऱ्यांची चिंता वाढली ! राज्यासाठी पुढचे तीन दिवस महत्वाचे, आज 29 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Next Post

युको बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ५०० पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
युको बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ५०० पदांसाठी भरती

युको बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ५०० पदांसाठी भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

काँग्रेसला मोठा धक्का ! माजी आमदाराचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश

February 27, 2026
मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

February 27, 2026
क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page