आंध्र प्रदेशमधून आज पहाटे एक भीषण दुर्घटना घडलीय. ज्यात हैदराबादवरुन बंगळुरुला जात असलेल्या एका खाजगी बसला भीषण आग लागली. , या भीषण दुर्घटनेत २० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवाशी जखमी झाले. हा अपघात आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यामधील कुरनूल जिल्ह्यातील कल्लूर मंडल परिसरातील चिन्ना टेकुरू गावाजवळ घडला. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये सुमारे 40 प्रवासी प्रवास करत होते. आग लागल्यानंतर किमान 12 प्रवाशांनी तत्काळ इमर्जन्सी एक्झिटमधून उडी मारून आपला जीव वाचवला. उर्वरित प्रवाशांपैकी अनेक जण गंभीररीत्या भाजले आहेत. सर्व जखमींना तात्काळ कुरनूल जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघातात २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये दुचाकीस्वाराचाही समावेश आहे. प्राथमिक तपासानुसार, मोटरसायकल बसला धडकल्यानंतर तिचा फ्युएल कॅप उघडली आणि बसखाली ओढल्या गेल्याने त्यात आग लागली. बसला लागलेली आग इतकी भीषण होती की प्रवाशांना बसमधून बाहेर पडण्याची देखील संधी मिळाली नाही. काही प्रवाशांनी बसच्या काचा फोडून बाहेर उड्या मारल्या. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी या भीषण अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिलं आहे की, कुरनूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुर गावाजवळ घडलेल्या बस आगीच्या दुर्घटनेबद्दल ऐकून मला अत्यंत धक्का बसला आहे. ज्यांनी या अपघातात आपले जवळचे गमावले आहेत, त्या सर्व कुटुंबीयांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना. राज्य प्रशासन आणि अधिकारी जखमी तसेच बाधित कुटुंबांना आवश्यक ती सर्व मदत पुरवतील.















Discussion about this post