जळगाव । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अशातच पाचोऱ्यातील म्हसावद–नांद्रा रस्त्यावर माहिजी–कुरंगी दरम्यान दोन दुचाकीच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. तसेच तीन जण गंभीर जखमी झाले.
माहिजीहून पाचोऱ्याकडे येत असलेल्या विना नंबरच्या हिरो होंडा फॅशन मोटारसायकलवरून पाचोऱ्यातील दोन तरुण जात होते. त्याचवेळी विरूद्ध दिशेने सामनेरहून कासोदा येथे दिवाळीला मामाच्या गावाला दोन तरुणांची विना नंबरच्या दुचाकी येत होते. कुरंगी शिवारातील हिमंत वाणी यांच्या शेताजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात ऋषिकेश संदीप पाटील (वय. १६, रा. नगरदेवळा ता. पाचोरा) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ जळगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ऋषिकेश नगरदेवळा येथे शिक्षण घेत होता. अपघातात इतर तिघे तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मृत ऋषिकेश लहान असताना त्याच्या आईचे निधन झाले होते.















Discussion about this post