जळगाव । जळगाव तालुक्यातील लमांजन येथील एका मजुराचा गिरणा नदीवर आंघोळीसाठी गेल्यानंतर पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. जयसिंग सुभाष बारेला (४०, रा. शिरवेल, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे.
बारेला कुटुंब लमांजन येथे शेत मजुरीसाठी वास्तव्यास आहे. बारेला हे गिरणा नदीकाठावर आंघोळीसाठी गेले होते. परंतु,ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांची वृद्ध आई आणि बहिणीला चिंता वाटू लागली. दोघींनी नदीपात्र परिसरात पाहणी केली असता, नदीच्या किनाऱ्यावर जयसिंग यांचे कपडे आणि भ्रमणध्वनी दिसून आला.
जयसिंग नदीत बुडाल्याचा संशय आल्याने त्यांची आई आणि बहिणीने तातडीने लमांजन गावाचे पोलीस पाटील भाऊराव पाटील यांना माहिती दिली. त्यानुसार, रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात जयसिंग यांचा शोध घेण्यात आला. मात्र, ते कोठेच आढळून आले नाहीत. अखेर बुधवारी सकाळी गिरणा नदी पात्रातून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. यावेळी बारेला कुटुंबियांनी आक्रोश केला. या घटनेमुळे लमांजन गावात हळहळ व्यक्त होत असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.















Discussion about this post