नागपूर । महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील दंडकारण्य परिसरात गेली अनेक दशके माओवादी चळवळीचा सर्वोच्च चेहरा म्हणून ओळखला जाणारा वरिष्ठ जहाल नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपती याने आपल्या 60 सहकाऱ्यांसह आत्मसर्मपण केले आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा आत्मसमर्पण कार्यक्रम आज गडचिरोलीत पार पडतोय. यावेळी शरणागती पत्करणारे माओवादी त्यांचे शस्त्र मुख्यमंत्र्यांना सोपवत आहे आणि मुख्यमंत्री त्यांना संविधानाची प्रत सुपर्द केली आहे.
अधिकृत माहितीनुसार, भूपती हा आज 15 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औपचारिकपणे शस्त्रे खाली ठेवून भारतीय संविधान हाती घेतले आहे. भूपतीने यापूर्वी युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला होता, ज्यामुळे माओवादी चळवळीतील केंद्रीय नेतृत्वाशी त्याचे मतभेद निर्माण झाले होते आणि चळवळीत उभी फूट पडल्याचे दिसून आले होते. आता माओवादी नेता सोनू उर्फ भूपतीने त्याच्यासह 60 हून अधिक सहकाऱ्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद लवकरच हद्दपार होण्याची शक्यता आहे.
माओवाद्यांचा टॉप माओवादी नेता भूपती नेमका कोण?
माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव (Venugopal Rao) उर्फ सोनू उर्फ भूपती हा नक्षल चळवळीतील मेंदू समाजाला जातो. त्याने 2 नोव्हेंबर 1980 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील मोयाबिनपेठा येथे सीआरपीएफ आणि माओवाद्यांमध्ये पहिली चकमक झाली होती. तेव्हा तत्कालीन सीरपूर दलमचा पेद्दी शंकर हा माओवादी कमांडर ठार झाला होता. आणि तेव्हाच माओवाद्यांविरोधातला पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 1982 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा जवळील अमरादी या गावात माओवाद्यांनी पहिल्यांदा सामान्य व्यक्ती वर हल्ला केला होता. तेव्हा त्या भागातील शिक्षक राजू मास्टर यांचा उजवा हात माओवाद्यांनी कापला होता.















Discussion about this post