जळगाव । सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत असून यामुळे सोन्याने विक्रमी पातळी गाठली आहे. दरम्यान जळगावातील सराफा बाजारपेठेतील सोने-चांदीचे दर समोर आले आहे. आज सोने दरात घसरण झालीय. दुसरीकडे चांदीचा दर मात्र वधारला आहे.
गुंतवणूकदारांमुळे चांदीच्या भाव वाढ झाली आहे. सोन्याचे दर वाढत असल्याने अनेकजण चांदीच्या लहान लहान वस्तू खरेदी करत आहेत. त्यामुळे आता चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जळगावातील सोन्याचे दर किती झालेत ते जाणून घ्या.
आजचे सोन्याचे दर
सोने २२ कॅरेट (Gold 22k ) 110190 रुपये
सोने २४ कॅरेट (Gold 24k) 121200रुपये
चांदी (प्रति किलो) (Silver Rate) 167000
दिवाळीआधी सोन्याचे दर घसरले
ऐन दिवाळीच्या आधी सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे २००० रुपयांची घसरण म्हणजेच १० तोळ्यामागे जवळपास २० हजारांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर वाढत होते त्यामुळे ग्राहकांनी चांदी खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहेत. त्यामुळे चांदीचे दरदेखील वाढत आहे. आता सोन्याच्या दरातील ही घसरण अशीच व्हावी, अशी आशा ग्राहकांना आहे.















Discussion about this post