रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई केली जाते. अशीच एक कारवाई RBI ने महाराष्ट्रातील एका बँकेवर केली आहे. ज्यामुळे खातेदारांमध्ये खळबळ उडाली आहे. RBI ने सोलापूरच्या समर्थ सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत.
या निर्बंधामुळे आरबीआयच्या पूर्व परवानगीशिवाय नवीन कर्ज देऊ शकणार नाही, ठेवी स्वीकारू शकणार नाही किंवा कोणतीही मालमत्ता विक्री अथवा हस्तांतर करू शकणार नाहीये. तर बँकेच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करून ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यास देखील आरबीआयकडून (RBI) मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयने निर्बंध आणल्याच्या बातमीनंतर आज सकाळपासून बँकेसमोर मोठी गर्दी जमली आहे. ठेवीदारांना आपली ठेव काढून घ्यायची असल्याने बँकेसमोर घाईगडबड आणि तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. ऐन दिवाळीच्या तोंडावर बँकेत पैसे अडकल्याने ठेवीदारांसमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय.
अनेक ठेवीदारांना रुग्णालयाचे बिल, औषधे खरेदी तसेच अनेक वैयक्तिक कामांसाठी पैसे हवे आहेत. मात्र आरबीआय ने घातलेल्या निर्बंधांमुळे ठेवीदारही हतबल झाले आहेत. बँकेचे अधिकार्यांचे आणि RBI कडील पुढील आदेश आल्यापर्यंत ठेवीदारांनी संयम राखावा, असे बँक कर्मचाऱ्यांचे आवाहन आहे.















Discussion about this post