देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय सैन्यात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन अर्मीत ग्रुप सी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे.
इंडियन आर्मीतील ()या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली असून त्यामुळे ज्यांना ग्रुप सी पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर करावा. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२५ आहे. इच्छुकांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
या पदांसाठी भरती
या भरती मोहिमेत लोवर क्लर्क डिविजन, फायरमॅन, व्हेईकल मॅकेनिक, फिटर, वेल्डर, ट्रेड्समॅन, वॉशरमॅन, कुक, टेलिकॉम मॅकेनिक पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.
पात्रता
भारतीय सैन्यात ग्रुप सी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी, बारावी आणि आयटीआय प्राप्त केली केलेली असावी. याचसोबत विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. याचसोबत उमेदवारांनी उंची १६५ सेंटीमीटर, छाती ८१.५ सेंटीमीटर आणि वजन ५० किलो असावे.
| जाहिरात (PDF) | Click Here |
| अर्ज (Application Form) | Click Here |
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणीद्वारे केली जाणार आहे. लेखी परीक्षा रिजनिंग, जनरल नॉलेज, न्युमेरिकल अॅप्टीड्यूड टेस्ट होणार आहे.या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर मिळणार आहे. तुम्ही आधी अधिसूचना वाचा त्यानंतरच अर्ज करावेत.















Discussion about this post