Friday, July 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पिस्तुलाचा धाक दाखवत पेट्रोल पंपावर दरोडा, धुळ्यातील धक्कादायक घटना CCTV मध्येकैद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 7, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
पिस्तुलाचा धाक दाखवत पेट्रोल पंपावर दरोडा, धुळ्यातील धक्कादायक घटना CCTV मध्येकैद
बातमी शेअर करा..!

धुळे: रात्रीच्या वेळी महामार्गालगतचे पेट्रोल पंप किती असुरक्षित आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी एक धक्कादायक घटना धुळ्यात घडली आहे. धुळे च्या शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे पेट्रोल पंपावर चार दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत 22 हजार रुपयांची रोकड लुटल्याचे समोर आले आहे. ही घटना CCTV मध्येकैद झाली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील दहिवद गावाजवळ असलेल्या सदाशिव पेट्रोल पंपावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. चार संशयित एकाच दुचाकीवर येऊन पेट्रोल पंपावर पोहोचले. त्यापैकी दोघांच्या हातात पिस्तुल होते. पंपावर ड्युटीवर असलेले कर्मचारी सोमनाथ गवळी, सुनील नगराळे व संतोष नगराळे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून पैशांची मागणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच संशयितांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर रोकड भरलेली बॅग हिसकावून घेऊन चौघेही आरोपी दुचाकीवरून पसार झाले.

शिरपूर तालुक्यात दहिवद येथील एका पेट्रोल पंपावर पहाटेच्या वेळी तोंडाला रुमाल बांधलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी शस्त्राचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांकडून रोख रक्कम लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. pic.twitter.com/XNH9TP6JkG

— Times Now Batmya (@timesnowbatmya) October 6, 2025

दरोडेखोरांचे संपूर्ण कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
दरोडेखोरांनी चेहऱ्यावर कापड गुंडाळलेले असल्यामुळे त्यांची ओळख स्पष्टपणे पटली नाही. घटनेच्या वेळी पेट्रोल पंपाच्या शेजारील हॉटेल बंद होते. तसेच सुरक्षा रक्षक रजेवर होता. याचाच फायदा घेत दरोडेखोरांनी ही धाडसी चोरी केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती पेट्रोल पंपाचे संचालक तरुण शर्मा यांनी तातडीने पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान, दरोडेखोरांचे संपूर्ण कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

देशसेवेची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर! भारतीय सैन्यात विविध पदांसाठी भरती

Next Post

खेडी कढोलीमध्ये दोन गटात तुफान हाणामारी ; १३ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खेडी कढोलीमध्ये दोन गटात तुफान हाणामारी ; १३ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

खेडी कढोलीमध्ये दोन गटात तुफान हाणामारी ; १३ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
IBPS अंतर्गत ग्रॅज्युएट पाससाठी 8594 पदांवर भरतीची घोषणा

पदवीधरांना बँकिंग क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! IBPS कडून ६,७१५ पीओ पदांसाठी बंपर भरती

July 3, 2026
चोपड्यात शस्त्रतस्करीचा डाव उधळला; LCBच्या कारवाईत तिघे जेरबंद, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

चोपड्यात शस्त्रतस्करीचा डाव उधळला; LCBच्या कारवाईत तिघे जेरबंद, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 3, 2026
शेतकऱ्यांनो! दुकानात बियाणे खरेदीला जाताना ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा

शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील 63,511 कर्जखात्यांची माहिती शासनच्या पोर्टलवर अपलोड

July 3, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी विविध योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page