मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे घरं, जनावरं तसेच शेतीमधील पिकांचं मोठं नुकसान झाले. ऐन हातातोंडाशी आलेला घास असा निसर्गानं हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यातच सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी आदर्शवत निर्णय घेतला आहे. अस्मानी संकट ओढवलेल्या शेतकर्यांना मंत्री छगन भुजबळ यांनी मदतीचा हात दिला आहे.
छगन भुजबळ यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपलं एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील इतर २८७ आमदारांनी आदर्श घ्यावा, असं पाऊल छगन भुजबळ यांनी उचलले आहे.छगन भुजबळ यांच्या या निर्णयाचे महाराष्ट्रात कौतुक होत आहे.
छगन भुजबळ यांनी आपले एक महिन्याचे वेतन शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांसाठी जे जे शक्य होईल ते ते सर्व करण्याचे प्रयत्न करणार असल्याचा शब्द छगन भुजबळ यांनी दिला आहे. दरम्यान छगन भुजबळ यांच्यानंतर आता आणखी कोण कोणता आमदार शेतकऱ्यांसाठी सरसावतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post