महाराष्ट्रातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोशल मीडिया अकाऊंट एक्स (ट्वीटर) झाले असून, त्यावर पाकिस्तान आणि तुर्की येथील व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मात्र, यामुळे पुन्हा एकदा सायबर हल्ल्यामुळे सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अधिकृत एक्स (Twitter) खाते हॅक झाल्यानंतर या खात्यावर पाकिस्तान आणि तुर्की येथील व्हिडिओ पोस्ट झाले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांचं ट्वीटर हे खातं रेकव्हर करण्यात येत आहे. असं असलं तरी ही घटना उच्चस्तरीय सायबर हल्ला आणि राजकीय हस्तक्षेप मानली जात आहे.
या घटनेचा आता सायबर पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. खाते कुणी हॅक केले याचा शोध पोलिस घेत आहे, खाते हॅक करण्याचा मागचा हेतू काय होता ? याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.















Discussion about this post