मुंबई । मराठा आरक्षणासाठी मुंबईत आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालीआंदोलन सुरु आहे. जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात हायकोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान कोर्टाने काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
मुंबईतील रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यावरूव हटवा असे आदेश सरकारला दिले आहे. तसेच आंदोलकांना मुंबईत येण्यापासून थांबवा, उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत ही कारवाई करा असं कोर्टाने म्हटलं आहे.आजच्या दिवसाची सुनावणी पूर्ण झाली असून उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यानंतरच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी कोर्टाकडून स्पष्ट आदेश येऊ शकतो. न्यायमुर्ती रवींद्र घुगेंच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली
मराठा आंदोलनाबाबत झालेल्या सुनावणीत कोर्टाने म्हटलं की, आंदोलनाचे आयोजक यांची जबाबदारी होती की 5 हजारपेक्षा अधिक लोकांना आणू नये. मुंबईतल्या आझाद मैदान व्यतिरिक्त इतर ठिकाणी ते वावरू नयेत. तसेच सकाळी 9 ते 6 पर्यंत आझाद मैदानात परवानगी होती. त्यानुसार त्यांनी 6 नंतर मैदान खाली करणे आवश्यक होते मात्र तसे झाले नाही. दरम्यान, गणेशोत्सवात मुंबईत कोंडी व्हायला नको. त्यामुळे आंदोलकांना मुंबईत येऊ देऊ नका, त्यांना बाहेरच ठेवा. तसेच जे आंदोलक रस्त्यावर आहेत त्यांना हटवा, पुढील 24 तासांमध्ये ही कारवाई करा असे निर्देश कोर्टाने सरकारला दिले आहेत.
आंदोलनामुळे यंत्रणा ठप्प – सदावर्ते
हायकोर्टात मराठा आंदोलनाबाबत युक्तिबाबत करताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, या आंदोलनामुळे सीएसएमटी आणि परिसरात चार मोठी रुग्णालय आहेत. तिथलं जनजीवन आणि आवश्यक यंत्रणा ठप्प झाल्या आहेत. सीएसएमटी हे अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे तिथे आंदोलन केल जात आहे. कोर्टाच्या आजूबाजूलही आंदोलक आहेत. रेल्वेच्या फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, एसी डब्यात वाट्टेल तसे आंदोलक फिरत आहेत. आंदोलक गाड्यांचे लायसन्स आहे का? असे वाहनधारकांकडे विचारात आहेत, रेल्वे ट्रॅकवर उतरत आहेत, सगळ्या रस्त्यांवर गाड्या अडवत आहेत असं म्हणत सदावर्तेंनी सीएसटीमधल्या तुफान गर्दीचे व्हिडिओ आणि फोटो न्यायाधीशांना दाखवले.















Discussion about this post