मुंबई । येत्या काही दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्याआधीच ग्रामपंचायत निवडणुकीबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राज्य सरकार नवी पात्रता लागू करणार आहे. त्यानुसार पाच वर्षांत थकबाकीदार नसलेल्या व्यक्तीलाच ग्रामपंचायत निवडणुकीस उभे राहता येणार आहे.
ग्रामपंचायतींच्या कराची थकबाकी मोठी आहे, हे कमी करणं एक मोठं आव्हान ठरतेय. यासाठी शासनस्तरावर लवकरच मोठे निर्णय घेण्यात येणार आहेत. यात समृद्ध पंचायतराज अभियान काळात एकरकमी कर भरल्यास ५० टक्के करमाफी देण्यात येणार आहे. तर पाच वर्षांत थकबाकीदार नसलेल्या व्यक्तीलाच ग्रामपंचायत निवडणुकीस उभे राहता येणार आहे. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलीय.
मंत्री जयकुमार गोरे सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिरातील सरपंच कार्यशाळेत ग्रामविकास मंत्री बोलत होते. ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. गावातील प्रश्न गावातच सुटण्यासाठी ग्रामविकास काम करत आहे. शासनाच्या सर्व योजनांची एकत्रित अंमलबजावणी करण्यासाठी करण्यासाठी ‘समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवण्यात येत असल्याची माहिती जयकुमार गोरे यांनी दिलीय.
गावामधील थकीत कराची मोठी समस्या असते. हा कर नियमितपणे शासनाच्या तिजोरीत जमा होण्यासाठी अभियान कालावधीत एकरकमी कर भरणाऱ्यांना ५० टक्के करमाफी देण्याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचं मंत्री गोरे यांनी सांगितलं. कार्यशाळेत गायरान जमिनीवर घरकुलास परवानगी मिळत नसल्याची तक्रार चपळगावचे सरपंच सिद्धाराम यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती. यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घरकुलांसाठी सर्व अटी व नियम शिथिल केले असल्याचं सांगितलं. ९० दिवसात घरकुलांची कामे पूर्ण करायची असतील, तर या अडचणी प्राधान्याने सोडवल्या गेल्या पाहिजेत. वेळ पडली तर नियम बदलू, कायदा बदलू पण कामे थांबली जाणार नाहीत, असे आश्वासन पालकमंत्री गोरे यांनी यावेळी दिले.















Discussion about this post