उल्हासनगर महानगरपालिकेअंतरात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान आणि 15 व्या वित्त आयोगांतर्गत वैद्यकीय आणि आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती मोहीम सुरू केली आहे. या भरतीसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड निवड केली आहे. इच्छुक उमेदवार 8 सप्टेंबर 2025 ते 12 सप्टेंबर 2025 या वेळेत अर्ज सादर करू शकतात. थेट मुलाखतीद्वारे ही भरती होणार आहे.
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
या भरतीमध्ये सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ आणि अर्धवेळ) आणि 15 व्या वित्त आयोगांतर्गत (UHWC), हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (HBT), आणि पॉलिटेक्निकमधील पदांचा समावेश आहे.
पात्रतेच्या अटी –
उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा आणि त्याच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा. ज्या उमेदवारांना अनुभव आहे आणि उच्च शिक्षण आहे, त्यांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवारांनी अर्जामध्ये त्यांची संपूर्ण माहिती अचूकपणे नमूद करणे आवश्यक आहे. यामध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्रानुसार असलेले नाव, जन्मतारीख, वय, लिंग, वैवाहिक स्थिती (आवश्यक प्रमाणपत्रांसह) आणि संपर्क तपशील इत्यादी माहिती देणे अनिवार्य आहे. अर्ज विहित नमुन्यात भरलेला असावा आणि त्यात दिलेली माहिती अंतिम मानली जाईल. उमेदवारांनी त्यांचे ग्रेड पॉइंट सरासरी (GPA) किंवा गुणांची टक्केवारी आणि विद्यापीठाने टक्केवारी मोजण्यासाठी वापरलेला फॉर्म्युला नमूद करणे आवश्यक आहे.
PDF: नोटिफिकेश पीडीएफ – https://drive.google.com/file/d/1D
वयाची अट :
सामान्य उमेदवारांसाठी किमान वय 18 वर्षे आहे. खुल्या प्रवर्गासाठी कमाल वय 38 वर्षे आणि आरक्षित प्रवर्गासाठी 43 वर्षे आहे. वैद्यकीय अधिकारी/ विशेषज्ञ पदांसाठी कमाल वय 70 वर्षे आहे, तर GNM, ANM, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन आणि मल्टीपर्पज वर्कर पदांसाठी 65 वर्षे आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या उमेदवारांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून (District Surgeon) फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे जाहिरातीत नमूद केलेली आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. त्यांनी त्यांच्या अंतिम वर्षातील गुण आणि टक्केवारी अचूकपणे नमूद करणे आवश्यक आहे.
मुलाखतीची तारीख आणि वेळ –
उमेदवारांना अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह 8 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2025 दरम्यान दुपारी 12:00 ते 2:00 या वेळेत उल्हासनगर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य विभागात जमा करायचे आहेत. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान पदांसाठी मुलाखती सकाळी 9:00 ते सायंकाळी 5:00 या वेळेत, 15 व्या वित्त आयोगांतर्गत वैद्यकीय आणि आरोग्य विभागातील पदांसाठी सकाळी 8:00 ते दुपारी 4:00 या वेळेत, तर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यातील पदांसाठी दुपारी 2:00 ते रात्री 10:00 या वेळेत घेण्यात येतील.















Discussion about this post