नवी दिल्ली । भटक्या कुत्र्यांबद्दल सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देऊन श्वानप्रेमींना मोठा दिलासा दिला आहे. आतापर्यंत निवारागृहात ठेवलेल्या कुत्र्यांना कुत्रे सोडून फक्त धोकादायक आणि आजारी कुत्र्यांनाच निवारागृहात ठेवण्याचे आदेश दिले आहे. भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करून त्यांना पुन्हा सोडण्यात येईल असे देखील निर्देश कोर्टाने दिले आहे.
न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखाळील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निकाल दिला. त्यासोबतच कोर्टाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनाही नोटीस जारी केली आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशातच कोर्टाचे आदेश लागू होणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ११ ऑगस्ट रोजीच्या आदेशात दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरातील (एनसीआर) रस्त्यावरील सर्व भटक्या कुत्र्यांना पकडून निवारागृहात ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यांना निवारागृहातून सोडण्यास मनाई करण्यात आली होती. ते पुन्हा रस्त्यावर येणार नाहीत याची खात्री करण्यास प्रशासनाला न्यायालयाने सांगितले होते. राजधानी दिल्लीतील भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या घटनांची न्यायालयाने स्वेच्छा दखल घेत त्यावर सुनावणी घेतली आणि सुधारित निकाल दिला.
न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या तीन न्यायमूर्तीच्या खंडपीठाने सांगितले की, कुत्र्यांना जंतनाशक औषध आणि लसीकरण केल्यानंतर त्यांना निवारागृहातून सोडण्यात यावे. भटक्या कुत्र्यांना सोडण्यावरील बंदी स्थगित करण्यात येईल. त्यांना जंतनाशक औषध द्यावे, त्यांचे लसीकरण करावे आणि पुन्हा त्यांना त्याच भागात परत सोडावे,” असे निर्देश न्यायालयाने आज दिले.
दरम्यान, आक्रमक असलेल्या अथवा रेबीज झालेल्या कुत्र्यांना निवारागृहातून सार्वजनिक ठिकाणी सोडले जाऊ नये, असे तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने स्पष्ट केले. न्यायालयाने पुढे असे म्हटले आहे की, भटक्या कुत्र्यांना खाद्य टाकण्यासाठी स्वतंत्र जागा निर्माण करावी. केवळ त्याच जागेवर भटक्या कुत्र्यांना खाद्य दिले जाईल. सार्वजनिक ठिकाणी खाद्य दिले जाणार नाही. असे केल्यास कारवाई केली जाईल, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.















Discussion about this post