जळगाव । जळगाव शहरातील रामपेठ भागात राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. जयेश मुरलीधर खडके (वय २७, रा. रामपेठ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून एमसीएचे शिक्षण घेऊन तीन ते चार वर्षे लोटले गेले तरी मनासारखी नोकरी मिळाली नाही. त्यातून आलेल्या नैराश्यात या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनने परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.
जयेश नेहमी घरात खालील मजल्यावर झोपायचा. रात्री वडिलांना मी वरच्या मजल्यावरील खोलीत झोपतो असे सांगून गेला. त्यानंतर तो झोपला की नाही हे पाहण्यासाठी त्याचे वडील वरच्या खोलीत गेले असता त्यांना जयेश याने गळफास घेतल्याचे दिसले. मनपाचे माजी उपमहापौर यांनी शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांना कळवून नंतर मृतदेह जीएमसी रुग्णालयात नेला
शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. जयेशच्या पश्चात आई-वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, जयेश हा नोकरी मिळत नसल्याने नैराश्यात होता. त्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे त्याच्या नातलगांकडून सांगण्यात येते आहे.















Discussion about this post