Saturday, March 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रातील 20 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या ;कोणत्या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 18, 2025
in महाराष्ट्र
0
मुख्यमंत्र्यांच्या सहसचिवांसह महाराष्ट्रातील 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; नव्या सरकारचा निर्णय
बातमी शेअर करा..!

महाराष्ट्र शासनाने 17 जुलै 2025 रोजी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले आहेत. राज्यातील 20 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने दिले आहेत. या बदल्यांमध्ये अनेक वरिष्ठ आणि महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या?

एम.एम. सूर्यवंशी : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेले सूर्यवंशी यांची वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दीपा मुधोळ-मुंडे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, पुणेच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावरून त्यांची समाज कल्याण आयुक्त, पुणे येथे बदली झाली आहे.

नीलेश गाटने : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गाटने आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार सांभाळतील.

ज्ञानेश्वर खिलारी : ओबीसी, बहुजन कल्याण, पुणेचे संचालक म्हणून कार्यरत असलेले खिलारी यांची अतिरिक्त आयुक्त आणि अतिरिक्त संचालक, भूमी अभिलेख, पुणे येथे बदली झाली आहे.

अनिलकुमार पवार : वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त असलेले पवार यांची आता एमएमआरएसआरए, ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सतीशकुमार खडके : महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई येथील (आपत्कालीन व्यवस्थापन) संचालक पदावरून त्यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे.

भालचंद्र चव्हाण : भूमी सर्वेक्षण विकास एजन्सी, पुणेचे आयुक्त असलेले चव्हाण यांना महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे (आपत्कालीन व्यवस्थापन) संचालक म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.

सिद्धार्थ शुक्ला : 02 जुलै 2025 रोजीच्या आदेशात बदल करून, सहाय्यक जिल्हाधिकारी, गोडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर येथून त्यांची आता प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, धारणी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, धारणी उपविभाग, अमरावती येथे बदली झाली आहे.

विजयसिंग शंकरराव देशमुख : छत्रपती संभाजीनगर विभागाचे अतिरिक्त आयुक्त-2 म्हणून कार्यरत असलेले देशमुख आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतील.

विजय भाकरे : जिल्हा जात पडताळणी समिती, भंडाराचे अध्यक्ष असलेले भाकरे यांची आता विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूरचे सदस्य सचिव म्हणून बदली झाली आहे.

त्रिगुण कुलकर्णी : मेडिया (MEDA), पुणेचे अतिरिक्त महासंचालक असलेले कुलकर्णी यांची आता यशदा (YASHADA), पुणेचे उपमहासंचालक म्हणून बदली झाली आहे.

गजानन पाटील : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले गजानन पाटील त्यांच्या त्याच पदावर कायम राहतील.

पंकज देवरे : जिल्हा जात पडताळणी समिती, लातूरचे अध्यक्ष असलेले देवरे यांची आता पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, पुणेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महेश पाटील : पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त (महसूल) असलेले पाटील यांची आता आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणेचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

मंजिरी मनोळकर : नाशिक विभागाच्या संयुक्त आयुक्त (पुनर्वसन) असलेल्या मनोळकर यांची आता महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणेच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आशा अफजल खान पठाण : मुख्यमंत्री सचिवालय, नागपूरच्या संयुक्त सचिव असलेल्या पठाण त्यांच्या त्याच पदावर कायम राहतील.

राजलक्ष्मी शफीक शाह : कोकण विभाग, मुंबईच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त (सामान्य) असलेल्या शाह यांची आता माविम (MAVIM), मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सोनाली  मुळे : जिल्हा जात पडताळणी समिती, अमरावतीच्या अध्यक्ष असलेल्या मुळे यांची आता ओबीसी, बहुजन कल्याण, पुणेच्या संचालक म्हणून बदली झाली आहे.

गजेंद्र  बावणे : जिल्हा जात पडताळणी समिती, बुलढाणाचे अध्यक्ष असलेले बावणे यांची आता भूमी सर्वेक्षण विकास एजन्सी, पुणेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रतिभा  इंगळे : जिल्हा जात पडताळणी समिती, सांगलीच्या अध्यक्ष असलेल्या इंगळे यांची आता अल्पसंख्यांक विकास आयुक्त, छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विधानभवन परिसरातील राड्यावर राज ठाकरेंचा उद्विग सवाल ; म्हणाले..

Next Post

शेतकऱ्यांच्या पीकविमा योजनेतून कंपन्यांनी किती कोटी कमविले? कृषिमंत्र्यांनी सांगितला आकडा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रब्बी हंगामातील पिक विमा उतवण्यासाठी मुदतवाढ; ही आहेत शेवटची तारीख

शेतकऱ्यांच्या पीकविमा योजनेतून कंपन्यांनी किती कोटी कमविले? कृषिमंत्र्यांनी सांगितला आकडा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारतीय सैन्यात २ लाखांहून अधिक पगाराच्या नोकरीची संधी.. या पदांवर निघाली भरती

भारतीय सैन्यात नोकरीची उत्तम संधी! २५,००० हून अधिक पदे भरली जाणार

March 7, 2026
महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

March 7, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

LPG सिलिंडरनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडणार

March 7, 2026
उन्मेश पाटील शिंदे गटात; “ते पुन्हा खासदार होतील”, शिंदेंच्या वक्तव्याने जळगावच्या राजकारणात खळबळ

उन्मेश पाटील शिंदे गटात; “ते पुन्हा खासदार होतील”, शिंदेंच्या वक्तव्याने जळगावच्या राजकारणात खळबळ

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page