Thursday, April 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पाचोऱ्यात लोखंडी रॉड डोक्यात टाकून वृद्धेची हत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 6, 2025
in जळगाव जिल्हा
0
पाचोऱ्यात लोखंडी रॉड डोक्यात टाकून वृद्धेची हत्या
बातमी शेअर करा..!

जळगाव । पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे अमानुषतेचा कळस गाठणारी घटना घडली आहे. इथं ५ वर्षीय जनाबाई पाटील यांचा लोखंडी रॉडने डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला. मारेकऱ्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील सोन्याच्या बाळ्या असा एकूण तीन तोळे सोन्याचे दागिने ओरबाडून पलायन केले. या घटनेमुळे शेवाळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जनाबाई पाटील या शेवाळे येथील त्यांच्या मातीच्या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा कृष्णराव माहरु पाटील हे शेजारील दुमजली घरात राहतात. घटनेच्या दिवशी, गुरुवारी कृष्णराव पाटील हे त्यांच्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा येथे गेले होते. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते घरी परतल्यानंतर, त्यांना आपली आई झोपलेल्या ठिकाणी मृतावस्थेत आढळली. अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून डोक्याचे दोन तुकडे केले होते. तसेच, गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची पोत आणि कानातील दोन तोळ्याच्या सोन्याच्या बाळ्या ओरबाडून चोरट्यांनी वृद्ध महिलेला पलंगाखाली टाकून तिच्यावर अंथरूण पांघरूण टाकले होते.

या घटनेची माहिती मिळताच, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपाधीक्षक धनंजय वेरूळे, पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, उपनिरीक्षक विठ्ठल पवार, प्रकाश पवार, एलसीबी टीम, फॉरेन्सिक लॅब टीम आणि डॉग स्क्वॉड तातडीने घटनास्थळी दाखल झाले. डॉग स्क्वॉडने गावातच सुगावा काढल्याने, वृद्ध महिलेचा मारेकरी हा गावातीलच असावा असा प्राथमिक संशय पोलिसांना आहे.

या प्रकरणी मयत महिलेच्या मुलाने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णराव पाटील बाहेरगावी गेल्याची खबर लागल्याने रात्री साडेदहा ते पावणे अकरा वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत असून, लवकरच आरोपी हाती लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे शेवाळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; लाखाच्या घरात पगार मिळेल; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Next Post

भुसावळकडून जळगावच्या दिशेने निघालेल्या रिक्षाला भीषण अपघात; एकाच मृत्यू, दोन प्रवासी गंभीर जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

भुसावळकडून जळगावच्या दिशेने निघालेल्या रिक्षाला भीषण अपघात; एकाच मृत्यू, दोन प्रवासी गंभीर जखमी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

जळगावातून विधान परिषदेसाठी भाजप-शिवसेनेकडून यांचे नाव चर्चेत

April 23, 2026
पदभार स्वीकारताच हरदीप पुरींनी केली मोठी घोषणा ; पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार?

निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारने दिलं ‘हे’ मोठं स्पष्टीकरण 

April 23, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता; उष्णलहरींचा धोका लक्षात घेऊन पशुधन संरक्षणासाठी उपाययोजना

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता; उष्णलहरींचा धोका लक्षात घेऊन पशुधन संरक्षणासाठी उपाययोजना

April 23, 2026
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात; प्रकाशकाला दिली जीवे मारण्याची धमकी

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात; प्रकाशकाला दिली जीवे मारण्याची धमकी

April 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page