भारतीय अंतराळ संशोधन संघटना म्हणजेच इस्त्रोमध्येनोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इस्त्रोमध्ये टेक्निकल, सायंटिस्ट, लायब्ररी असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी तुम्ही isro.gov.in आणि vssc.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून २०२५ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
टेक्निकल असिस्टंट, मेकॅनिकल असिस्टंट, कॉम्प्युटर सायन्स असिस्टंट, केमिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, रेफ्रिजरेशन टेक्निकल असिस्टंट, लॅब असिस्टंट अशा विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग / इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरिंग / मेकॅनिकल इंजिनियरिंग या विषयात डिप्लोमा केलेला असावा. जर तुम्ही शैक्षणिक पात्रतेत बसत असाल तरच या नोकरीसाठी अर्ज करावेत.ग्रंथालय सहायक पदासाठी बॅचलर पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे असावी. सहाय्यक पदासाठी ४४९०० ते १,४२,४०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि स्कील टेस्टद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला अर्ज करताना ७५० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही.
Discussion about this post